Monday 21 November 2011

शहीद तुकाराम ओंबळेंच्या पुतळ्याची प्रतिकृती

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्याची कामगिरी दिवंगत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी बजावली होती. त्यांच्या या साहसाची आठवण म्हणून गिरगाव चौपाटीवर त्यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. शिल्पकार राजन यावलकर यांनी हा पुतळा साकारला आहे. आज या पुतळ्याची मातीची प्रतिकृती प्रेस क्लबमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. गिरगाव चौपाटीवर येत्या 26 नोव्हेंबरला तुकाराम ओंबळे यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा बसवण्यात येईल. 


News Source:http://ibnlokmat.tv/showstory.php?id=204682


अजितदादा Says :माझे आजोबा होते टेस्ट क्रिकेटर -

अजितदादा Says :माझे आजोबा होते टेस्ट क्रिकेटर -

हो, माझे आजोबा सदु शिंदे हे टेस्ट क्रिकेटर होते, ते एक उत्तम स्पिनर होते आणि त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व सुध्दा केलं आहे राज ठाकरे रणजीचा विचार करत आहे पण आमचे आजोबा तर टेस्ट क्रिकेटर होते असा टोला लगावत अजितदादांनी राज ठाकरेंची विकेट काढली. राज यांनी जरा शांत डोक ठेवून विचार करावा मग आरोप करावा उगाच खोटे आरोप करु नये असा सल्लावजा इशाराही अजितदादांनी दिला.



काल रविवारी पुण्यात झालेल्या मनसेच्या परिवहन अधिवेशनात राज ठाकरे यांनी ही महापालिका निवडणुकांची सभा नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. आमच्या बापजाद्यानी नांगर फिरवलं का असं विचारणार्‍या अजित पवारांच्या बापजादे काय क्रिकेट खेळायचे काय ? त्यांच्या बापजाद्यांनी काय रणजी ट्राफी खेळली आहे का अशी तिखट टीका राज ठाकरे यांनी पवारांवर केली.

तसेच पवारांना बारामतीहून मुंबई पुण्यातील जमिनीचे स्केवेअर फुटांचे भाव कळत असतील तर आम्हालाही शेतातले कळेच असा टोला राज यांनी लगावला. राज यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवारांनी राज यांना क्लिन बोल्डचं केलं. माझे आजोबा सदु शिंदे हे टेस्ट क्रिकेटर होते ते उत्तम स्पिनर होते आणि त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व सुध्दा केलं आहे राज ठाकरे रणजीचा विचार करत आहे पण आमचे आजोबा टेस्ट क्रिकेटर होते.

एवढचं नाही तर ज्या पुण्यात येऊन राज यांनी खोटा आरोप केला त्याच पुण्यात माझ्या आजोबांच्या नावाने 'सदु शिंदे लीग' ह्या क्रिकेट स्पर्धा भरतात असा खुलासाही अजितदादांनी केला. राज ठाकरे यांनी शांत डोक ठेवून आणि संपूर्ण माहिती घेऊन आरोप करावा उगाच खोटे आरोप करु नये असा सल्लावजा इशाराही अजितदादांनी दि