विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारावरच आज मोठय़ा संख्येने
पोलिसांची कुमक तैनात केलेली पाहायला मिळाली. सुमारे दीडशेहून अधिक पोलीस
आज तैनात करण्यात आले होते. तसेच सकाळी पोलिसांच्या तीन गाड्या बाहेर उभ्या
केल्या होत्या.
विद्यापीठात येणार्यांची संपूर्ण तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते. तसेच सोबत आणलेल्या सामानाचीही झडती घेतली जात होती. कोणत्याही आंदोलनाची हवा निर्माण झाली तर विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था तसेच पोलीस यंत्रणेचा आधार घेण्याची तयारी विद्यापीठाने केलेली पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे तसेच विद्यार्थी संघटनांनी अनेक वेळा तोडफोड केली आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून विद्यापीठाने जाणीवपूर्वक सुरक्षा यंत्रणेकडे लक्ष वेधले आहे.
■ परीक्षा विभागामार्फत झालेला गोंधळ आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणारी टीवाय बीकॉमच्या पेपरची फेरपरीक्षा यामुळे विद्यार्थी संघटना विरुद्ध मुंबई विद्यापीठ असे वातावरण पाहायला मिळते.
■ फेसबुकवरही विद्यापीठाच्या निषेधाच्या कमेंट पडत आहेत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थी संघटनांना रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठ पोलीस संरक्षणाचा वापर करत असलेले दिसत आहे.
■ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या अधिकार्यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. मनविसे, युवा सेना, एसएफआय, अभाविपकडून कुलगुरू हटाव ही मागणी सातत्याने जोर धरत आहे.

No comments:
Post a Comment