Saturday, 31 December 2011

Mumbai मध्य रेल्वेने वर्षभरात काय दिले?

मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीच्या माध्यमातून मुख्य मार्गावरील सीएसटी ते कर्जत-खोपोली, कसारा हार्बर मार्गावर सीएसटी-पनवेल तसेच व ट्रान्स हार्बरच्या ठाणे-पनवेल-बेलापूर आदी मार्गावरून दिवसाला सुमारे १७ लाख प्रवासी अप-डाऊन मार्गे प्रवास करतात. त्यात आता आणखी एक लाख प्रवाशांची भर पडल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. यातून दिवसाला सुमारे दोन-अडीच कोटींची उलाढाल होत असूनही रेल्वे अर्थसंकल्पात ठेंगा मिळालेल्या उपनगरीय प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने वर्षभरात काहीना काहीतरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा आढावा-
...........................................
जानेवारी - तिकीटघरांच्या ठिकाणी गर्दीतून सुटकेसाठी एटीव्हीएम यंत्रांच्या ठिकाणी मार्गदर्शक, वितरक नेमले 
.........................
मार्च -टागोरनगर, विक्रोळी, आणि अँटॉप हील या ठिकाणी इंडिया पोस्ट पीआरएस कार्यालये,
पहिला डीसी रेक 
..........................
एप्रिल- विद्याविहार स्थानकादरम्यान पाचव्या-सहाव्या लाईनसाठी ठाणे-एलटीटी दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
....................
मे - विज्ञान प्रदर्शन मेलचे सीएसटी स्थानकात आगमन
....................
जून- दिवा-वसई रोड मार्गावर नव्या डीएमयूच्या फेर्‍या; पनवेल-वसई रोड मार्गावर नव्या मेमू फेर्‍या; विक्रोळी स्थानकात पादचारी पूल 
.....................
■ जुलै : उपनगरीय प्रवाशांसाठी लोकलचे वेळापत्रक; सुरक्षेसाठी नव्या १२७५ हेल्पलाईनची निर्मिती; विवेकानंद एक्स्प्रेसचे सीएसटी स्थानकात आगमन; ९ डब्यांच्या २९ लोकलचे १२ डब्यांमध्ये रूपांतरण
...........................
■ ऑगस्ट : शुद्ध पाण्याचे व्हेंडिंग मशीन सीएसटी स्थानकात; ठाकुर्ली, कोपर, दिवा स्थानकात मराठी इंडिकेटर्स (आगामी काळात दादर, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सँडहस्र्ट रोड)
.......................
■ सप्टेंबर : विक्रोळीचे लेव्हल क्रॉसिंग गेट वाहनांसाठी बंद
.............................
■ ऑक्टोबर : ९ डब्यांच्या १९ लोकलचे १२ डब्यांत रूपांतर; दादर स्थानकात प्रीपेड टॅक्सी सेवा; सीएसटी स्थानकात दुसरे वातानुकूलित प्रतीक्षालय; नेरळ-माथेरान मार्गावर नवीन मिनी ट्रेन
...............................
■ नोव्हेंबर : सीवुड-दारावे येथील लेव्हल क्रॉसिंग गेट बंद आणि वाहनांसाठी रोड ओव्हर ब्रीज, मुख्य मार्गावरील सर्वच्या सर्व ७८५ लोकल १२ डब्यांच्या; एनएच-३च्या रोड ओव्हर ब्रीजसाठी ३५ ट्रॅफिक ब्लॉक; कोपरी-ठाणे आणि कांजूरमार्गच्या रोड ओव्हर ब्रीजसाठी १२ ट्रॅफिक ब्लॉक; एलटीटी स्थानकात प्रीपेड टॅक्सी सेवा; दिवा, कोपर पादचारी पुलाला एक्स्टेंशन; गरोदर महिलांना अपंगांच्या डब्यातून प्रवासाची मुभा

Mumbai ऑनलाईन परीक्षा पद्धत सुधारणार

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश पद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आपल्या खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. 
या तीन जिल्ह्यांमध्ये २00९-१0पासून अकरावीचे ऑनलाईन प्रवेश होतात. तथापि, या पद्धतीत काही त्रुटी असून, त्यात सुधारणा करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेसने शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन केली होती. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. आता शासनाने नेमलेली समिती सध्याच्या पद्धतीचा अभ्यास करून मागील तीन वर्षांत राहिलेल्या त्रुटी कशा दूर करता येतील, याबाबत अहवाल देईल. सुधारित ऑनलाईन प्रवेश पद्धतीच्या अंमलबजावणीतही सहकार्य करेल. समितीचे सदस्य असे - शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक); पुणे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ; पुणेचे अध्यक्ष, तंत्रशिक्षण उपसचिव, हिंदुजा कॉलेजचे प्राचार्य डॉ. तु.आ. शिवारे, स्वामी विवेकानंद कॉलेज; चेंबूरच्या प्राचार्या लीना गोळे, मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण माणगावकर, प्रगती महाविद्यालय; डोंबिवलीचे प्राचार्य ए.पी. महाजन, पत्रकार प्रवीण मुळ्ये, सायली मंकीकर, एमकेसीएल; पुणेचे महाव्यवस्थापक संजय चिपळूणकर, पालक-शिक्षक प्रतिनिधी विक्रम करंदीकर (रुईया कॉलेज), रमेश देशपांडे (भवन्स कॉलेज). मुंबईचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे समितीचे सदस्य सचिव असतील.

दीडच्या आत उऽऽ लाला! सेलिब्रेशन शिस्तीतही करता येते; हायकोर्टाने सुनावले

शिस्तीने व कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही सेलिब्रेशन करता येते, असे मत व्यक्त करत नववर्षाच्या स्वागतासाठी येत्या रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू ठेवण्याची मुभा मिळावी ही हॉटेल चालकांची मागणी उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
मुंबईतील १३४ हॉटेल मालकांनी केलेल्या या याचिकेवर न्या. एम.एल. टाहिलयानी व न्या. गिरीश गोडबोले यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात नववर्षानिमित्त केवळ बार व हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देणारे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. 
या परिपत्रकात हॉटेलमधील ऑर्केस्ट्रासाठी अशा प्रकारची सवलत दिलेली नाही. ऑर्केस्ट्रासाठी केवळ मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील जे.एस. सलुजा यांनी न्यायालयाला दिली.
ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मात्र, काही हॉटेल्सना पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी परवाना शुल्कही घेण्यात आले असल्याचे हॉटेल्सच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले गेले. त्यावर हे पैसे परत दिले जातील, असे सरकारी वकील सलोजा यांनी स्पष्ट केले. 
............
हॉटेलमधील ऑर्केस्ट्रासाठी परवानगी देताना त्यांना आवाजाच्या र्मयादेचे बंधन शासनाने घातले होते का? मध्यरात्री दीड वाजल्यानंतर किती जणांना ऑर्केस्ट्रा ऐकायचा आहे यासाठी सर्व्हे केला होतात का, असा सवाल न्यायालयाने केला.

Mumbai 31 2011 थर्टी फस्र्ट....

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईला विविध ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर ४ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
■ सीएसटी-कल्याण ही लोकल सीएसटीहून पहाटे १.१0ला सुटून कल्याणला पहाटे २.२0ला पोहोचेल
■ कल्याण-सीएसटी ही लोकल कल्याणहून पहाटे १.१५ला सुटून सीएसटीला पहाटे २.४५ला पोहोचेल
■ सीएसटी-पनवेल ही लोकल सीएसटीहून पहाटे १.२0ला सुटून पनवेलला पहाटे २.४0ला पोहोचेल
■ पनवेल-सीएसटी ही लोकल पनवेलहून पहाटे १.२0ला सुटून सीएसटीला पहाटे २.४0ला पोहोचेल.
■ या सर्व लोकल धीम्या गती मार्गावरून धावणार असल्याने या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. 
नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर सज्ज झाला असून, टारगट तरुणांवर वॉच ठेवण्यासाठी खास कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Thursday, 29 December 2011

Mumbai to play first game at Wankhede

“We’re very happy to be back at the Wankhede after four years. It’s a very good feeling.” Wasim Jaffer’s words captured the mood of Mumbai’s dressing room on the eve of their final league game against Punjab on Wednesday. At last, Mumbai are at ‘home’ again.
The team’s joy at having rediscovered their original ‘dressing room,’ even though for a game that doesn’t hold any significance, for them at least, reflected on their faces as they prepared to strut their stuff on their favourite stage

Beautiful Mumbai Photo