शिस्तीने व कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही सेलिब्रेशन करता येते, असे मत व्यक्त करत नववर्षाच्या स्वागतासाठी येत्या रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू ठेवण्याची मुभा मिळावी ही हॉटेल चालकांची मागणी उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
मुंबईतील १३४ हॉटेल मालकांनी केलेल्या या याचिकेवर न्या. एम.एल. टाहिलयानी व न्या. गिरीश गोडबोले यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात नववर्षानिमित्त केवळ बार व हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देणारे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.
या परिपत्रकात हॉटेलमधील ऑर्केस्ट्रासाठी अशा प्रकारची सवलत दिलेली नाही. ऑर्केस्ट्रासाठी केवळ मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील जे.एस. सलुजा यांनी न्यायालयाला दिली.
ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मात्र, काही हॉटेल्सना पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी परवाना शुल्कही घेण्यात आले असल्याचे हॉटेल्सच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले गेले. त्यावर हे पैसे परत दिले जातील, असे सरकारी वकील सलोजा यांनी स्पष्ट केले.
............
हॉटेलमधील ऑर्केस्ट्रासाठी परवानगी देताना त्यांना आवाजाच्या र्मयादेचे बंधन शासनाने घातले होते का? मध्यरात्री दीड वाजल्यानंतर किती जणांना ऑर्केस्ट्रा ऐकायचा आहे यासाठी सर्व्हे केला होतात का, असा सवाल न्यायालयाने केला.

No comments:
Post a Comment