Saturday, 31 December 2011

Mumbai ऑनलाईन परीक्षा पद्धत सुधारणार

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश पद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आपल्या खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. 
या तीन जिल्ह्यांमध्ये २00९-१0पासून अकरावीचे ऑनलाईन प्रवेश होतात. तथापि, या पद्धतीत काही त्रुटी असून, त्यात सुधारणा करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेसने शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन केली होती. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. आता शासनाने नेमलेली समिती सध्याच्या पद्धतीचा अभ्यास करून मागील तीन वर्षांत राहिलेल्या त्रुटी कशा दूर करता येतील, याबाबत अहवाल देईल. सुधारित ऑनलाईन प्रवेश पद्धतीच्या अंमलबजावणीतही सहकार्य करेल. समितीचे सदस्य असे - शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक); पुणे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ; पुणेचे अध्यक्ष, तंत्रशिक्षण उपसचिव, हिंदुजा कॉलेजचे प्राचार्य डॉ. तु.आ. शिवारे, स्वामी विवेकानंद कॉलेज; चेंबूरच्या प्राचार्या लीना गोळे, मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण माणगावकर, प्रगती महाविद्यालय; डोंबिवलीचे प्राचार्य ए.पी. महाजन, पत्रकार प्रवीण मुळ्ये, सायली मंकीकर, एमकेसीएल; पुणेचे महाव्यवस्थापक संजय चिपळूणकर, पालक-शिक्षक प्रतिनिधी विक्रम करंदीकर (रुईया कॉलेज), रमेश देशपांडे (भवन्स कॉलेज). मुंबईचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे समितीचे सदस्य सचिव असतील.

No comments:

Post a Comment