Friday, 2 March 2012

Mumbai समुद्र मंथन! या योजनेमुळे होणारे फायदे केंद्राची मंजुरी; समुद्राचा गाळ उपसून मुंबई न्हावा-शेवा होणार आणखी खोल


न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदर मुंबईच्या खाडीला जोडणारा सागरी मार्ग आणखी खोल तसेच प्रशस्त करण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे १५७१.६0 कोटी रुपये खर्चाचा हा पहिला टप्पा मार्गी लागणार असून, मोठय़ा जहाजांची वाहतूक सुकर होणार आहे. किंबहुना या कामाला मंजुरी देण्याच्या मसुद्यातच मोठय़ा म्हणजे सहा हजार टनी जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग प्रशस्त होण्याची बाब नमूद केली आहे.
मुंबईची खाडी आणि न्हावा-शेवा यांना जोडणार्‍या या मार्गिकेची लांबी २९ कि.मी.वरून वाढवून ३३.५४ कि.मी. तर खोली १४ मीटरपर्यंत वाढविण्याचाही त्यात समावेश आहे. हा प्रकल्प साकार झाल्यावर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणार्‍या मोठय़ा जहाजांना मालाच्या चढ-उतारासाठी सध्या करावी लागणारी प्रतीक्षा संपुष्टात येईल, शिवाय रोजगाराच्या आणखी संधीही उपलब्ध होतील. या योजनेमुळे होणारे फायदे मोठी जहाजेही थेट आतपर्यंत येऊ शकतील. आंतरराष्ट्रीय कंटेनर जहाजांच्या वाहतुकीतील अडचणी दूर होतील. जहाजावरून मालाची चढ-उतार वेगाने शक्य होईल. बंदराच्या क्षमतेचा अधिकाधिक उपयोग.
या भागात समुद्राची खोली वाढवून मोठय़ा जहाजांसाठी मार्ग प्रशस्त करण्यात येणार आहे.
     

No comments:

Post a Comment