धाडीत १00 जणांना अटक ■ १९ विदेशी तरुण-तरुणींचा समावेश
जुहू (प.) येथील ओकवूड प्रीमियर हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत 'सन्डे एन्जॉय' करणार्या सुमारे १00 धनिक तरुण-तरुणींची नशा आज रात्री मुंबई पोलिसांनी उतरविली. या पार्टीत दोघा आयपीएल खेळाडूंसह १९ विदेशी तरुण-तरुणींचा समावेश असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. घटनास्थळाहून ११0 ग्रॅम कोकेन, १00 ग्रॅम चरससह अन्य रासायनिक पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
सर्व तरुण-तरुणींची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम पहाटेपर्यंत कुपर रुग्णालयात सुरू होते. त्यांचे रक्त व लघवी चाचणीसाठी घेण्यात आले असून पॉझिटीव्ह टेस्ट आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी आयपीएल खेळाडूंची नावे सांगितली नसली तरी त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वेन वॅन व पुणे वॉरियर्सचा राहुल शर्मा हे असल्याचे समजते. त्याशिवाय अभिनेत्री रिया सेनचा बॉयफं्रेड विशाल हंडा, डीजे डिझायनर हीप्पीज् याच्यासह बॉलिवूड व उद्योग जगताशी संबंधित धनिकांच्या मुलामुलींचा समावेश आहे.
रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील एक तारका (सध्या फारशी चर्चेत नसलेली) आणि दिग्गज अभिनेत्याची पत्नीही या पार्टीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या रेव्ह पार्टीचे आयोजन कुणी केले होते, हे स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत तपास सुरू असल्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
या हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सुमारे १५0 अधिकारी-कर्मचार्यांसह हॉटेलवर छापा टाकला. त्या वेळी ३८ तरुणी व ५८ तरुण अर्धनग्न व बीभत्स अवस्थेत पाश्चात्त्य संगीताच्या तालावर नाचत होते. त्यामध्ये आयपीएलमधील दोन खेळाडूही होते. छापा टाकला असल्याचे लक्षात येताच नशेत असलेले हे तरुण-तरुणी हडबडून गेले. काहींनी मोठय़ाने ओरडणे व रडण्यास सुरुवात केली.
ओकवूडमध्ये काहीजण पार्टीसाठी रविवारी एकत्र येणार आहेत. त्यामध्ये अमली पदार्थाचा वापर केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पूर्ण तयारीनिशी छापा टाकण्यात आला. असे विश्वास नांगरे-पाटील यांनी सागिंतले.

No comments:
Post a Comment