Tuesday, 29 May 2012

Mumbai इमारती धोकादायक विभागवार अनधिकृत इमारतींची संख्या

 बेलापूर ३; नेरूळ १५; वाशी १८; तुर्भे ४; कोपरखैरणे ३; घणसोली ११; ऐरोली ९; दिघा ७ नवीमुंबई। दि. २८ (प्रतिनिधी)
पावसाळापूर्व खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने शहरातील ७0 धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एपीएमसीच्या कांदा, बटाटा मार्केटसह वाशीतील अग्निशमन केंद्रातील कर्मचारी वसाहतीचाही समावेश आहे. पावसाळ्यात अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी सदर इमारतींचा वापर थांबवावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील धोकादायक इमारती व इतर ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अशा इमारतींची यादी प्रसिद्ध करून व संबंधित नागरिकांना त्याविषयी माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ७0 इमारती धोकादायक आहेत. यामध्ये एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमधील ए, बी, सी, ई, एफ, जी, एच विंगचा समावेश आहे. या विंग धोकादायक असल्याचे घोषित करून जवळपास दहा वर्षे झाली आहेत. एपीएमसीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप हे काम मार्गी लागले नसल्यामुळे येथील माथाडी, व्यापारी, वाहतूकदार यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. येथील मॅफ्को मार्केटही धोकादायक असून व्यापार्‍यांनी मार्केटचा वापर थांबविला असून बाजूच्या शेडमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. वाशीतील जेएन २, ३, बी टाईप इमारतीही धोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतींची अवस्था बिकट असून पावसाळ्यात इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशीतील अग्निशमन केंद्रातील कर्मचारी 
निवासस्थानही धोकादायक घोषित केले आहे. कोपरखैरणेतील ओमसिद्धिविनायक गृहनिर्माण संस्था, निब्बाण टेकडीवरील संरक्षण भिंत, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरातील काही चाळीही धोकादायक घोषित केल्या आहेत. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना महापालिकेने नोटीस दिली आहे. या इमारती पावसाळ्यात कोसळून अपघात होऊ शकतो. यामुळे शक्य तिथे दुरुस्तीची कामे करण्यात यावीत व अतिधोकादायक बांधकामांचा वापर थांबवावा, असे आवाहन केले आहे. विभागवार अनधिकृत इमारतींची संख्या बेलापूर ३; नेरूळ १५; वाशी १८; तुर्भे ४; कोपरखैरणे ३; घणसोली ११; ऐरोली ९; दिघा ७ महत्त्वाच्या धोकादायक वास्तूंची माहिती
■ एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केट
■ एपीएमसीजवळील मॅफ्को मार्केट
■ नेरूळ सेक्टर ९ मधील सिडको समाजमंदिर
■ वाशीतील जेएन व बी टाईप इमारती
■ वाशीतील अग्निशमन केंद्रातील कर्मचारी निवासस्थान पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अपघात होऊ नये यासाठी धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या इमारतींचा वापर तत्काळ थांबविणे आवश्यक असून शक्य असेल तिथे तत्काळ दुरुस्तीची कामे करावीत.

No comments:

Post a Comment